परभणी : गंगाखेडची शाखा स्थापना ठरला ‘मनसे’च्या सचिन पाटील यांचा शेवटचा राजकीय कार्यक्रम | पुढारी

परभणी : गंगाखेडची शाखा स्थापना ठरला 'मनसे'च्या सचिन पाटील यांचा शेवटचा राजकीय कार्यक्रम

गंगाखेड पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे युवा नेते व परभणी शहराध्यक्ष सचिन पाटील सोमवारी मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे यांच्यासमवेत गंगाखेड तालुक्याच्या दौऱ्यावर होते. तालुक्यातील मुळे येथील शाखा स्थापना व नूतन सदस्यता नोंदणी अभियान हा सचिन पाटील यांचा शेवटचा राजकीय कार्यक्रम ठरला.

मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे यांच्या नेतृत्वाखाली गंगाखेड तालुक्याच्या विविध भागात मनसेच्या शाखा स्थापनेचा कार्यक्रम व नूतन सदस्य नोंदणी अभियान मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. तालुक्यातील मुळी येथील शाखा स्थापनेचा कार्यक्रमही युवकांच्या मोठ्या प्रवेशाने लक्षवेधी ठरला. परभणी जिल्ह्याच्या मनसेचा एक युवा चेहरा म्हणून प्रदेश उपाध्यक्ष बालाजी मुंडे यांनी परभणीचे शहराध्यक्ष सचिन पाटील यांना या कार्यक्रमासाठी आवर्जून निमंत्रित केले होते.

मुळी येथील शाखा स्थापनेच्या कार्यक्रमात त्यांनी युवकांना मार्गदर्शन केले. सोमवारी रात्री सचिन पाटील यांची निर्घृण हत्या झाली. सचिन पाटील यांचा हा शेवटचा राजकीय कार्यक्रम ठरला. सचिन पाटलांच्या रूपाने मनसेचा एक युवा चेहरा हरवल्याने तालुक्यातील मनसे कार्यकर्त्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा

Back to top button