परभणी : मनसेचे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा ब्लेडने वार करून खून

परभणी : मनसेचे शहर प्रमुख सचिन पाटील यांचा ब्लेडने वार करून खून

परभणी, पुढारी वृत्तसेवा : येथील वसमत रस्त्यावरील शिवराम नगर भागातील रहिवासी आणि मनसेचे शहरप्रमुख सचिन भीमराव पाटील यांचा मंगळवारी (ता. ६) पहाटे ब्लेडचे वार करून खून करण्यात आला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला; तो मृतदेह शवविच्छेदनाकरिता जिल्हा शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आला आहे.

दरम्यान, हा घातपाताचा प्रकार आहे हे लक्षात आल्यानंतर नवा मोंढा पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आहे. कारण सचिन पाटील यांच्या मानेवर ब्लेडचे वार आढळून आले आहेत. त्यांचे बंधू व सहकाऱ्यांनी सचिन पाटील यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल केले. पण उपचार सुरू असताना मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पाटील हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे धडाडीचे कार्यकर्ते, नेते होते.

हे ही वाचा :

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news