नांदेड : केरुर येथे मोटारसायकल-खासगी बसची धडक; एकजण जागीच ठार

नांदेड : केरुर येथे मोटारसायकल-खासगी बसची धडक; एकजण जागीच ठार

नरसीफाटा : पुढारी वृत्तसेवा : बिलोली तालुक्यातील केरूर वळणावरील घाटात मोटरसायकल व खासगी ट्रॅव्हल्स बसची धडक होऊन झालेल्या भिषण अपघातात मोटरसायकलस्वार जागीच ठार झाला. पंडित मनोहर बावणे (वय ३२, रा. भोपळा) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. आज (दि.२ सप्टें) सायंकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास ही घटना घडली.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, भोपाळा येथील पंडित बावणे हे सासरवाडी असलेल्या सगरोळी येथून आदमपूर फाटा मार्गे नरसीकडे येत होते. सदर मोटारसायकल केरुर घाटावरील रस्त्यावर येताच मोटारसायकल आणि बसमध्ये जोरदार धडक झाली. या भिषण अपघातात मोटारसायकल वरील पंडित मनोहर बावणे हा युवक जागीच ठार झाला‌. या घटनेचे माहिती रामतीर्थ पोलीस ठाण्याला मिळताच स.पो.नि संकेत दिघे यांनी तातडीने घटनास्थळी अदमपूर बीट जमादार अशोक इंगळे यांना पाठवून मयताचे शव नायगांव ग्रामीण रुग्णालयात पाठविले. मयत पंडित बावणे यांच्या पश्चात आई – वडील, २ भाऊ, १ बहीण, पत्नी, मुलगा-मुलगी असा परिवार आहे.

हेही वाचलतं का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news