बीडमध्ये विनायक मेटेंच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांची रिघ, आज अंत्यसंस्कार | पुढारी

बीडमध्ये विनायक मेटेंच्या अंत्यदर्शनासाठी दिग्गजांची रिघ, आज अंत्यसंस्कार

बीड; पुढारी वृत्तसेवा : तळागाळातील सामान्य माणसाचा नेता, अशी ओळख असलेल्या विनायक मेटे यांचे पार्थिव बीडमध्ये येताच त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी अक्षरश: रिघ लागली आहे. रविवारी रात्री त्यांचे पार्थीव बीडमध्ये आणण्यात आले. त्यांचे बंधु रामहरी मेटे यांच्या बाशी रोडवरील निवासस्थानी सोमवारी सकाळपासून लोकांनी मोठी गर्दी होती.

विनायक मेटे यांचे मराठा समाजाच्या प्रश्‍नावर मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीसाठी जात असताना अपघाती निधन झाले. ही दु:खद घटना बीडमध्ये समजताच सर्वत्र शोककळा पसरली. रविवारी रात्री विनायक मेटे यांचे पार्थीव मुंबई येथून बीडमध्ये आणण्यात आले. सोमवारी (दि.15) सकाळी बार्शी रोडवरील रामहरी मेटे यांच्या तुकाई निवासस्थानी पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी अंत्यदर्शन घेण्यासाठी अक्षरश: रिघ लागली होती.

12 वाजता अंत्ययात्रा निघणार आहे. तर अंत्यसंस्कार सायंकाळी ४ वाजता होणार आहे. त्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री येणार आहेत.

हेहा वाचा : 

Back to top button