पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार का?; ‘त्या’ ट्विटचा आमदार संजय शिरसाटांनी केला खुलासा | पुढारी

पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार का?; 'त्या' ट्विटचा आमदार संजय शिरसाटांनी केला खुलासा

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी एका ट्विटमध्ये शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचा ‘कुटुंब प्रमुख’ असा उल्लेख केला होता. त्यानंतर शिरसाट हे नाराज असून पुन्हा ठाकरेंच्या शिवसेनेत परतणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. यावर शिरसाट यांनी खुलासा करताना उद्धव ठाकरे यांच्याविषयीचे शुक्रवारचे ट्विट हे तांत्रिक चुकीचा परिणाम असल्याचे म्हटले आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या सोबतच असल्याचे सांगत सुरू असलेल्या चर्चांना त्यांनी पूर्ण विराम दिला.

मंत्रिमंडळ विस्ताराच्या पहिल्या टप्प्यात समावेश न झाल्याने शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट नाराज असल्याची चर्चा आहे. त्यातच शुक्रवारी रात्री त्यांच्या ट्विटरवरून उद्धव ठाकरे यांचा कुटुंब प्रमुख असा उल्लेख करणारे ट्विट करण्यात आले. त्यामुळे शिरसाट ठाकरे गटात परतणार असल्याच्या चर्चेने जोर धरला होता. त्यावर शिरसाट यांनी खुलासा करत आपण शिंदे यांच्या सोबतच असल्याचे सांगितले. मंत्रिपद न मिळाल्याने वाईट वाटतंय, पण विस्ताराची वाट पाहू, असे आमदार शिरसाट यांनी म्हटले आहे.

आपण एकनाथ शिंदे यांच्याकडे कॅबिनेट मंत्रीपद आणि औरंगाबादच्या पालकमंत्री पदाची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांच्याविषयीचे ट्विट हे तांत्रिक चुकीचा परिणाम होते. ते ट्विट मार्च महिन्यात केले होते. पण ते स्पॅनमध्ये गेले आणि काल रात्री पोस्ट झाले. मी एकनाथ शिंदे यांच्या सोबतच आहे, मी नाराज नाही, असे शिरसाट यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

Back to top button