हिंगोली : धानोरा येथे रानभाज्या महोत्सव उत्साहात ; शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद | पुढारी

हिंगोली : धानोरा येथे रानभाज्या महोत्सव उत्साहात ; शेतकऱ्यांचा उत्तम प्रतिसाद

हयातनगर, पुढारी वृत्तसेवा : वसमत (ता.धानोरा) येथे  आज ( दि. 12 )रोजी कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन (आत्मा) व कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव उत्‍साहात साजरा झाला. महोत्सवात करटोली,सुरण कंद, हादगा, तांदुळजा,अळु,पाथरा, कपाळफोडी,भुई,चिवळ,तरोटा या 25 ते 30 रानभाज्याचे स्टॉल लावून रानभाज्या विक्रीसाठी ठेवून शेतकऱ्यांनी या भाज्यांचे महत्त्‍व सांगितले

नैसर्गिकरित्या उगवलेल्या विषमुक्त रानभाज्या दररोजच्या आहारात समावेश असणे खूप महत्त्‍वाचे आहे. त्यामुळे नागरिकांनी जीवनसत्त्वे व खनिजांनी परिपूर्ण असलेल्या रानभाज्यांचा समावेश आहारात करावा,असे आवाहन तालुका कृषी अधिकारी जी.बी.कल्याणपाड यांनी या वेळी केले.

रानभाजी महोत्सवाचे उद्धघाटन सरपंच राजीव एगंडे यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी उपसरपंच नवनाथ राऊत  होते. सूत्रसंचालन ‘आत्मा’चे के.एस.घुगे यांनी केले.

यावेळी कृषी अधिकारी शंकर उपलवाड, शिवनेरी चव्हाण, आत्मयाचे के.एस.घुगे, कृषी पर्वेक्षक व्ही.के शिंदे, निता जावळे, कृषी सहायक प्रल्हाद चव्हाण, कृषी पर्यवेक्षक सोळंके, भिमराव कांबळे, दादाराव राऊत, बालाजी राऊत, केशव राऊत यांच्यासह धानोरा,भोगाव,पळशी, व दारेफळ या भागातील शेतकरी व नागरिक उपस्थित होते.

    हेही वाचलंत का?

Back to top button