पिंपळदरी येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा | पुढारी

पिंपळदरी येथे आदिवासी दिन उत्साहात साजरा

औंढा नागनाथ पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथसह पिंपळदरी येथे 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रारंभी गावातून बिरसा मुंडा यांच्यातील चित्राची भव्य मिरवणूक काढून विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केलेल्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सरपंच सौ. रत्नमाला संजय भुरके या होत्या. प्रमुख पाहुण्यांमध्ये डॉ. कोंढवा माघाडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य संजय भुरके, डॉ. कौशल्या बेले, पंजाबराव शेळके, मुख्याध्यापक विठ्ठल खपले, उपसरपंच धम्मदी भगत हे होते. दीपप्रज्वलन करून प्रतिमापूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली.

डॉ. ऋषिकेश हलगे, डॉ. अजय बेले, शाहरुख शेख, संतोष डहाळके, नंदकुमार मुकाडे, सखाराम रिठे, कविता रिठे, संजय काळे, तुकाराम भगत, ज्ञानदेव ढाळके, संजय घोंगडे, वर्षा भुरके, नयन रिठे, तनवी घोंगडे, वैभव फलटणकर, अक्षय माहूरकर, पुजारी रामदास चिबडे, आशुतोष मोघे आदी मान्यवरांचा विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्त चालक कृष्णा कल्याणकर यांनी कोरोना काळामध्ये विशेष आरोग्य सेवा पुरवल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

केंद्र शासनाचे धोरण व आदिवासी समाजावर होणारे दुर्गामी परिणाम याबद्दल ॲड. सटवाजी नखाते यांनी आपले विचार व्यक्त केले. आदिवासी युवकावर होणारे दुर्गामी परिणाम याबद्दल डॉ. हनुमंत रिठे यांनी आपले विचार मांडले. तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव रिठे, पोलीस पाटील विश्वनाथ रिठे, सेवानिवृत्त उपविभागीय पोलीस अधिकारी शेषराव ठोंबरे, पंडित रिठे, केशव ठोंबरे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बबन रिठे, भगवान रिठे, अनिल भिसे, संजय रिठे, साहेबराव नाईक, साहेबराव डहाळके, मारुती धनवे, आदींनी परिश्रम घेतले आभार शिवाजी रिठे यांनी मानले.

हेही वाचा

Back to top button