धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय; जलसाठ्यात वाढ, चारही धरणांत 73.90 टक्के साठा | पुढारी

धरणक्षेत्रात पाऊस सक्रिय; जलसाठ्यात वाढ, चारही धरणांत 73.90 टक्के साठा

खडकवासला; पुढारी वृत्तसेवा: आठवडाभराच्या उघडिपीनंतर पानशेत, वरसगाव धरण भागांसह सिंहगड भागात पुन्हा पाऊस सक्रिय झाला आहे. त्यामुळे खडकवासला धरण साखळीत हळूहळू वाढ सुरू झाली आहे. सोमवारी (दि. 8 ) सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरण साखळीत 21.54 टीएमसी (73.90 %)इतका पाणीसाठा झाला आहे.  सकाळपासून पावसाची रिमझिम सुरू आहे. रायगड

जिल्ह्यालगतच्या पानशेत-वरसगाव धरण क्षेत्रासह सिंहगड भागात दुपारी जोरदार सरी कोसळल्या. खडकवासला परिसरात मात्र पावसाचे प्रमाण कमी आहे. खडकवासला येथे दिवसभरात केवळ 1 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. टेमघर येथे 25, वरसगाव येथे 16 व पानशेत येथे 15 मिलिमीटर पाऊस पडला. पावसामुळे भातपिकांसह खरीप पिकांना जीवदान मिळाले आहे. पुणे-पानशेत रस्त्यावर पाणी साठल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

धरण साखळीतील पाणीसाठा
खडकवासला 40.35 टक्के
वरसगाव धरण 75.32 टक्के
पानशेत 83.51 टक्के
टेमघर 59.57 टक्के

Back to top button