परभणी : मिरवणुकीनंतर चक्कर येवून पडल्याने विद्यार्थ्याचा मृत्यू

चारठाणा (परभणी) ; पुढारी वृत्तसेवा : चारठाणा येथील अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक पाहून आल्यानंतर एका १६ वर्षीय विद्यार्थीचा चक्कर येवून मृत्यू झाला. या विद्यार्थ्याचे नाव रितेश राजाभाऊ करसकर (वय १६) असे आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, रितेश करसकर हा दहावीच्या वर्गात चारठाणा येथील शाळेत शिकत होता. रविवारी (दि.७) रोजी शाळेला सुट्टी असल्याने त्याने दिवसभर शेतात काम केले. सध्याकाळी अण्णाभाऊ साठे जयंतीची मिरवणूक पाहायला गेला. मिरवणूक पाहून रात्री रितेश घरी आला होता. घरी आल्यानंतर अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला असता त्याच्या डोक्याला जबर मार लागला. यामध्ये त्याचा मृत्यू झाला.
आई- वडिलांना रितेश हा एकुलता एक मुलगा होता. या घटनेची माहिती परिसरात समजताच सर्वत्र हळहळ व्यक्त केली आहे.
- रायगड : लाटवण-दापोली मार्गावरील पुलावर पुराचे पाणी; वाहतूक विस्कळीत
- पुणे : महाळुंगे पडवळला हुतात्म्यांच्या स्मृतींचे जतन
- पुणे : पन्नास रुपये मिळाल्याने चोरांनी घेतले चक्क गल्ल्याचे दर्शन