औरंगाबाद : आमदार जैस्वाल यांची शिवसेना महानगर प्रमुख पदावरून उचलबांगडी; किशनचंद तनवाणी नवे महानगरप्रमुख | पुढारी

औरंगाबाद : आमदार जैस्वाल यांची शिवसेना महानगर प्रमुख पदावरून उचलबांगडी; किशनचंद तनवाणी नवे महानगरप्रमुख

औरंगाबाद, पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादमध्ये मतदारसंघाचे बंडखोर आमदार प्रदीप जैस्वाल यांची महानगरप्रमुख पदावरून उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आता शिवसेनेने माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची महानगरप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

प्रदीप जैस्वाल हे मागील सात वर्षांपासून शिवसेनेचे महानगरप्रमुख म्हणून काम करत होते. आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले, त्यात औरंगाबादमध्यो आमदार प्रदीप जैस्वाल यांचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता प्रदीप जैस्वाल यांचे महानगरप्रमुख पद काढून घेत त्या जागी शिवसेनेचे माजी आमदार किशनचंद तनवाणी यांची त्या पदावर नियुक्ती केली आहे. किशनचंद तानवाणी हे 2019 साली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेतून भाजपमध्ये गेले होते, नंतर ते पुन्हा शिवसेनेत परतले. परंतु आतापर्यंत त्यांची कोणत्याही पदावर वर्णी लावण्यात आली नव्हती. त्यामुळे काही दिवसांपासून ते पक्ष कार्यापासून दूर होते. आता आमदारांच्या बंडखोरीच्या पार्श्वभूमीनंतर त्यांना पुन्हा पक्षात सक्रिय करण्याच्या दृष्टीने त्यांची महानगरप्रमुख पदी नेमणूक करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button