औरंगाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्यामुळे रूग्णांच्या जिवाला धोका | पुढारी

औरंगाबाद : प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरल्यामुळे रूग्णांच्या जिवाला धोका

गंगापूर (जि. औरंगाबाद) : पुढारी वृत्तसेवा;  ३ ऑगस्ट रोजी झालेल्या धुवांधार पावसामुळे गंगापूर तालुक्यातील लासुर स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाणी शिरले. आरोग्य केंद्रात उपचार घेणाऱ्या रुग्णांना रात्र संपूर्ण जागून काढावी लागली. समोरील जागेतही पाणी साचल्यामुळे नवीन येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहेत.

प्राथमिक आरोग्य केंद्र लासूर स्टेशनमध्ये दरवर्षी परिसरात असेच पाणी साचत असल्याने ॲडमिट असणाऱ्या रुग्णांना व कर्मचाऱ्यांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. मागील कित्येक वर्षांपासून वार्डातील व कार्यालय खोल्यात पाणी साचून औषधी रजिस्टर, कपाट, फ्रिज, संगणक कपाट, किमती दस्तऐवज, औषधे भिजत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे दैनंदिन कामात कर्मचाऱ्यांना देखील अडचणी येत आहेत. मुसळधार पावसामुळे आरोग्य केंद्रात विद्युत प्रवाह उतरून शॉक बसत आहे. त्यामुळे रूग्णांना याचासुध्दा धोका होऊ शकतो. पाण्यात शॉर्टसर्किट होण्याची भीती आहे. मोठी बाजारपेठ असल्यामुळे या दवाखान्यात दररोज मोठ्या संख्येने रुग्ण असतात.येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जीर्ण अवस्थेत आहे.

सततच्या पावसामुळे इमारतीमध्ये पावसाचे पाणी नेहमीच येते व इमारतही पूर्णपणे गळत आहे. सर्व कर्मचारी आपला जीव धोक्यात घालून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये काम करत आहेत. अक्षरश: दवाखान्यात पाण्याचे डोह साचले आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी पर्यायी व्यवस्था करण्यात यावी. अशी मागणी उपचारासाठी दाखल असलेले रुग्ण करत आहेत. रूग्णांना आरोग्य केंद्रात थांबण्यासाठी देखील जागा शिल्लक नाही. रूग्णांचे बेड पावसाने भिजले आहेत. रूग्णांचे हाल मोठ्या प्रमाणात होत आहेत. त्यामुळे येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या व रुग्णांच्या जीवाला धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने याच्याकडे लक्ष घालून इमारत दुरुस्त करावी. दवाखान्याची इमारत जीर्ण झाल्यामुळे इमारतही पूर्ण गळत आहे. याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे. असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

इमारत जुनी असल्यामुळे पावसाचे पाणी इमारतीमध्ये वारंवार जाते. याबाबत वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवला आहे व तेथील रुग्णांना तात्पुरते स्वरूपामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र सिद्धनाथ वाडगाव येथे शिफ्ट केले जात आहे.

काल झालेल्या पावसामुळे प्राथमिक प्राथमिक आरोग्य केंद्र लासुर स्टेशनचे औषधी रजिस्टर, कपाट, फ्रिज यावर पाणी गळत आहे. त्यामुळे दैनंदिन कामात कर्मचाऱ्यांना देखील अडचणी येत आहेत. मुसळधार पावसामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये विधुत प्रवाह उतरून शॉक मारत आहे. त्यामुळे रूग्णांना याचासुध्दा धोका होऊ शकतो. संभाव्य पाण्यात शॉर्टसर्किट होण्याची भीती आहे.

संपत छाजेड, उपसरपंच, लासुर स्टेशन- सावंगी.

लासुर स्टेशनतील प्राथमिक आरोग्य केंद्रची इमारत ४५वर्षा पुर्वीची आहे. तिच्यासमोर जिल्हा परिषदेवर रस्ता दायगाव ते लासुरस्टेशन हा रस्ता उंच झाला आहे. इमारत जुनी असल्यामुळे खाली गेली आहे त्यामुळे पावसाचे पाणी इमारतीत नेहमीच घुसते यासाठी प्रशासनाने नवीन इमारतीस मंजुरी द्यावी
डॉ. प्रशांत बडे, तालुका आरोग्य अधिकारी गंगापूर

हेही वाचा

Back to top button