आम्ही ठाकरे यांच्या सोबतच ! नगरच्या शिवसैनिकांनी नव्या संपर्कप्रमुखांना केले आश्वस्त

आम्ही ठाकरे यांच्या सोबतच ! नगरच्या शिवसैनिकांनी नव्या संपर्कप्रमुखांना केले आश्वस्त
Published on
Updated on

नगर : पुढारी वृत्तसेवा : कितीही आमदार, खासदार, पदाधिकारी पक्षाशी गद्दारी करून सोडून गेले असले, तरी आम्ही सर्वसामान्य शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. नगर जिल्ह्याचे नवे संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांना नगरच्या शिवसैनिकांनी तसे आश्वस्थ केले. दरम्यान, शिवसेनेने माझ्यावर टाकलेली जबाबदारी सर्वांना बरोबर घेऊन पार पाडणार आहे. प्रत्येकाने आपली जबाबदारी व्यवस्थित पार पाडून पक्षाचे काम करावे, असे आवाहन नूतन जिल्हा संपर्कप्रमुख आमदार शिंदे यांनी केले.

शिवसेनेचे नूतन संपर्कप्रमुख आमदार शिंदे जिल्हा दौर्‍यावर आले असता, शासकीय विश्रामगृहात पदाधिकार्‍यांची बैठक घेत आढावा घेतला. याप्रसंगी जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, शहरप्रमुख संभाजी कदम, महापौर रोहिणी शेंडगे, जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र दळवी, उपजिल्हाप्रमुख गिरीश जाधव, माजी महापौर भगवान फुलसौंदर, अभिषेक कळमकर, युवासेना सहसचिव विक्रम राठोड, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, संजय शेंडगे, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, सचिन शिंदे, श्याम नळकांडे, अमोल येवले, विजय पठारे, योगिराज गाडे, दत्ता जाधव, संग्राम कोतकर आदी उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, शिवसैनिकांनी कोण गेले, कोण राहिले याचा विचार न करता गावागावांत शिवसेनेच्या शाखा उघडाव्या. आजची राजकीय परिस्थिती संघर्षाची असली तरी, सर्वसामान्य शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी असल्याने घाबरण्याचे कारण नाही.
प्रा. शशिकांत गाडे म्हणाले, शिवसैनिक पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आहेत. राज्यातील राजकीय घडामोडींचा नगर जिल्ह्यात कोणताही परिणाम झालेला नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news