औरंगाबाद : घाटी रूग्णालायातील निवासी डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण | पुढारी

औरंगाबाद : घाटी रूग्णालायातील निवासी डॉक्टरला रूग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : औरंगाबादच्या घाटी रूग्णालायातील निवासी डॉक्टरला रुग्णाच्या नातेवाईकांकडून मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. डॉ. उदय चेंडूर असे मारहाण करण्यात आलेल्या डॉक्टरांचे नावे आहे. या घटनेच्या निषेधार्थ निवासी डॉक्टरांनी आज काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

अपघात विभागाजवळील वॉर्ड नंबर 17 येथे सर्जरी विभागात निवासी डॉक्टर उदय चेंडूर आपली सेवा बजावत होते. मंगळवारी रात्री एका रुग्णाच्या नातेवाईकांनी त्यांना मारहाण केली. ही माहिती निवासी डॉक्टरांच्या मार्डला कळताच त्यांनी काम बंद आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत घाटी प्रशासन ठोस भूमिका घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू राहील, असा पवित्रा डॉक्टरांनी घेतला आहे.

हेही वाचा :

Back to top button