Hindi box office : १० कोटींचे बजेट, पण ‘या’ चित्रपटांनी केली छप्परफाड कमाई | पुढारी

Hindi box office : १० कोटींचे बजेट, पण 'या' चित्रपटांनी केली छप्परफाड कमाई

पुढारी ऑनलाईन डेस्क : साऊथ या बॉलिवूड चित्रपट असो निर्माते चित्रपट बनवण्यासाठी पावसासारखा पैसा खर्च करत असतात. चित्रपटातील एक- एक सीन उत्तम करण्यासाठी कोटी रूपये खर्च करत असतात. नायक-नायिकेच्या कपड्यांपासून ते गाणी आणि फीपर्यंत प्रचंड खर्च केला जातो. ऐवढा पैसा खर्च करून काही चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट होताच तर काही चित्रपट हिट होतील की नाही याची खात्री नसते. एखाद्या छोट्याशा खोलीत किंवा गल्लीत चित्रित झाला असला तरी उत्तम आशय आणि दमदार अभिनयाच्या जोरावर चित्रपट चालत असतात. ( Hindi box office )

बॉलिवूडमध्ये अशा अनेक चित्रपटांची उदाहरणे आहेत, ज्यांना बनवण्यासाठी १०० कोटींपेक्षा जास्त खर्च करण्यात आला आहे. परंतु, ते फ्लॉप झाले. परंतु, अशा चित्रपटांची यादीही कमी नाही. जे फक्त १० कोटींपेक्षा कमी बजेटमध्ये बनविले गेले आणि त्याची कमाई छप्परफाड झाली आहे. अशाच काही चित्रपटांची (वेबसीरीज) यादी जाणून घेवूयात. ( Hindi box office )

Bheja Fry – Seek Red

भेजा फ्राय

ब्लॉकबस्टर चित्रपट बनवायचा असेल तर त्यासाठी बजेटही चांगले लागते. तर कथा आणि कलाकार चांगले असतील तर चित्रपट बॉक्स ऑफिसवर धमाका करू शकतो. याचच उदाहरण म्हणजे, ‘भेजा फ्राय’ हा चित्रपट आहे. ‘भेजा फ्राय’ ही चित्रपट २००७ मध्ये ६० लाखांच्या बजेटमध्ये बनविण्यात आला होता. परंतु, बॉक्स ऑफिसवर रिलीज होताच कमाईत १८ कोटींहून अधिकच्या घरात पोहोचली. ही चित्रपटाची कमाई छप्परफाड आहे. यानंतर हा चित्रपटाचे हॉलिवूडमध्ये Dinner for Schmucks या नावाने रिमेक बनविण्यात आले. भेजा फ्राय यामध्ये अभिनेता रजत कपूर, विनय पाठक, सारिका, मिलिंद सोमण आणि रणवीर शौरीसारखे कलाकार आहेत.

Peepli [Live] (2010) - IMDb

पीपली लाईव्ह

बॉलिवूड अभिनेता आमिर खानची निर्मिती असलेला ‘पीपली लाईव्ह’ या चित्रपटाचे बजेट १० कोटींचे होते, मात्र या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४८ कोटींची भरघोष कमाई केली होती. हा चित्रपट २०१० मध्ये रिलीज करण्यात आला होता. हा चित्रपटात शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती आणि आत्महत्या या कथानकावर आधारीत आहे. ८३ व्या ऑस्करसाठी ‘पीपली लाईव्ह’ ची निवड झाली होती. परंतु, यातून बाहेर पडला होता.

नो वन किल्ड जेसिका | Netflix

‘नो वन किल्ड जेसिका’

मॉडेल जेसिका लालच्या जीवनावर आधारित ‘नो वन किल्ड जेसिका’ हा चित्रपट ९ कोटींच्या बजेटमध्ये बनविण्यात आला होता. रिलीज झाल्यानंतर या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ४६ कोटींची कमाई केली होती. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन आणि राणी मुखर्जी याच्या मुख्य भूमिका आहेत. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित ‘नो वन किल्ड जेसिका’ २०११ मध्ये रिलीज झाला होता. २०११ च्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटांपैकी हा एक मानला जातो.

Film Review Of Kahani 2 - Film Review: सिनेमा का गुड टच है 'कहानी-2' - Amar Ujala Hindi News Live

कहानी

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालनचा ‘कहानी’ चित्रपट २०१२ मध्ये रिलीज झाला होता. या चित्रपटाचे बजेट ८ कोटींचे होते. मात्र, या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०४ कोटींची कमाई केली आहे. इतकेच नाही तर सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटाने ३ राष्ट्रीय पुरस्कार आणि ५ फिल्मफेअर पुरस्कार जिंकल आहेत.

Paan Singh Tomar - Alchetron, The Free Social Encyclopedia

पानसिंह तोमर

बॉलिवूड अभिनेता इरफान खानचा २०१२ मध्ये पानसिंह तोमर हा चित्रपट अत्यंत कमीत- कमी ८ कोटींच्या बजेटमध्ये बनविण्यात आला आहे. मात्र, रिलीज होताच या चित्रपटाने १९ कोटींची भरघोष कमाई केली होती. या चित्रपटातील पानसिंह तोमरच्या भूमिकेसाठी इरफान खानला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याला सर्वोत्कृष्ट फिचर फिल्मचा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला.

Sale > vicky donor on hotstar > in stock

 

विक्की डोनर

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाचा ‘विक्की डोनर’ चित्रपटदेखील कमी बजेट पण जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांच्या यादीत आहे. विक्की डोनर हा चित्रपट २०१२ मध्ये बनविला असून त्याचे दिग्दर्शन शूजित सरकार यांनी केले होते. केवळ कमीत-कमी ५ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने सुमारे भरघोष ६७ कोटींची कमाई केली आहे.

Paan Singh Tomar Movie Stills - Bollywood Hungama

हेही वाचलंत का? 

Back to top button