हिंगोली : कुरुंदा येथे मुसळधार पावसाने जळेश्वर नदीला पूर; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान | पुढारी

हिंगोली : कुरुंदा येथे मुसळधार पावसाने जळेश्वर नदीला पूर; शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याचे लाखोंचे नुकसान

कुरुंदा; पुढारी वृत्तसेवा : कुरुंदा येथे शुक्रवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे शनिवारी सकाळी चार वाजण्याच्या सुमारास सुकळी ते कुरुंदा असलेल्या जळेश्वर नदीला पूर आला. या पुराचे पाणी संपूर्ण कुरुंदा गावांमध्ये शिरले. संपूर्ण गाव पाण्याने जलमय झाले होते. प्रत्येक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने संसार उपयोगी साहित्यसह अनेकग वस्तु पाण्यात वाहून गेल्या.

तसेच गावातील सर्वच दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानातील वस्तूही वाहून गेल्या आहेत. किराणा दुकानातील खाद्य वस्तूही पुराच्या पाण्यात वाहून गेल्या आहेत. दुकानाबाहेर गोड तेलांच्या टाक्याही या पाण्यात वाहून गेल्या. त्यामुळे किरण दुकानदारांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर कापड दुकान आणि रासायनिक खतांची दुकानच्या गोदामामधील सर्व खतांची गोणी या पावसामुळे भिजून गेल्याने व्यापाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर दुकानांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने शेतकऱ्यांचे हळदीचे पोतेही भिजले आहेत.

तसेच गावातील चारचाकी वाहने, दुचाकी वाहने हे देखील गावात पाणी शिरल्याने कोसो दूर वाहून गेली आहेत. गावातील विद्युत पुरवठा संपूर्ण बंद आहे. पाण्यामुळे विद्युत पोल खाली पडले आहेत. तसेच विविध कंपन्यांच्या मोबाईलची रेंज येत नसल्याने नागरिकांच्या एकमेकांशी संपर्क होत नाही. या पावसामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उगवलेली कोवळी पिके मोठ्या पावसाच्या गाळणे बुजून गेली आहेत. काही ठिकाणी शेतात टाकलेली हळदीची बेणे ही वाहून गेली आहेत. तसेच कापूस पीकावर मातीचा थर आल्याने नष्ट झाले आहेत.

१९७२ त्यानंतर २०१६ मध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यापेक्षाही आताची ही सर्वात मोठी ढगफुटीमुळे असल्याने शेतकरी, व्यापारी वर्ग आणि सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.

आज शनिवारी सकाळी पाच वाजल्यापासूनच आमदार राजू भैया नवघरे, सरपंच राजेश पाटील इंगोले, इतर विविध पक्षांचे पदाधिकारी, महसूलचे उपजिल्हाधिकारी सचिन खल्लाळ, तहसीलदार अरविंद बोळंगे, तलाठी श्री गरुड, ग्रामसेवक पवार आधी गावामध्ये ठाण मांडून आहेत. आणि नुकसान भागांची पाहणी करत आहेत. सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नदी पात्राचे पाणी कमी झाले आहे. गावातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी जागोजागी खिचडी व फराळांची व्यवस्था केली आहे.

हेही वाचलवंत का? 

Back to top button