पिंपरी : जमिनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ | पुढारी

पिंपरी : जमिनीच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ

पिंपरी : जमिनीवर अतिक्रमण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार सुतारवाडी येथे घडला. कालिदास किसनराव कोकाटे, नारायण बबनराव कोकाटे, शिवाजी पंढरीनाथ कोकाटे (सर्व रा. पाषाण, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.

याप्रकरणी 42 वर्षीय पीडितेने गुरुवारी (दि. 7) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची सुतारवाडी पाषाण येथे सात गुंठे जागा आहे. दरम्यान, आरोपींनी तीन ते चार वर्षांपूर्वी फिर्यादी यांच्या जागेवर अतिक्रमण करून त्यांना हाकलून दिले. तसेच, जमिनीवर ओकवूड नावाचे फर्निचरचे दुकान उभारले.

दुकान भाड्याने देऊन लाखो रुपयांचे भाडे घेतले. आरोपींनी फिर्यादी यांच्या मालकी हक्कास नकार दिला. आम्ही पाषाण गावातील स्थानिक रहिवासी असल्याचे म्हणत आरोपींनी फिर्यादी यांना जातीवाचक शिवीगाळ करीत धमकी दिली. फिर्यादी यांनी जमीन माघारी मागितली असता आरोपींनी जमीन देण्यास नकार दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Back to top button