हिंगोली : विजेचा झटका बसल्याने खांबावरून पडून कर्मचारी गंभीर जखमी | पुढारी

हिंगोली : विजेचा झटका बसल्याने खांबावरून पडून कर्मचारी गंभीर जखमी

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : कळमनुरी तालुक्यातील घोडा कामठा येथे विद्युत बिघाड दुरूस्ती करत असताना विजेचा झटका बसल्याने खांबावर पडून कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाला. रामकिशन मोरे (वय 32) असे कर्मचाऱ्याचे नाव आहे. 28 जून रोजी ही घटना घडली असुन शासकीय रूग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहीतीनुसार, घोडा कामठा येथे महावितरणच्या कर्मचारी व अधिकाऱ्याने कंत्राटी कामगार रामकिशन मोरे याला विद्युत बिघाड दुरूस्ती करण्यास सांगितले. दुरूस्तीकरीता रामकिशन खांबावर चढला असता त्याला विजेचा झटका बसला आणि तो खाली कोसळला. यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची माहीती आमदार संतोष बांगर यांना समजताच त्यांनी कर्मचाऱ्याला आर्थिक मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

कंत्राटी कामगार गंभीर जखमी झाल्याची घटना गुलदस्त्यातच!

अधिकाऱ्यांनी विद्युत प्रवाह चालू आहे किंवा नाही याची खात्री न करताच कंत्राटी कामगारास खांबावर चढवले. ही माहिती उघड होऊ नये म्हणून महावितरणच्या अन्य कर्मचारी व अधिकाऱ्यांनी औषध उपचाराकरीता सुरूवातीला पैसे दिले. पण आता कर्मचाऱ्यास औषध उपचारासाठी खर्च देणे बंद केले असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचलंत का ?

Back to top button