औंढा नागनाथ : सिद्धेश्वर येथे सासरच्‍या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल | पुढारी

औंढा नागनाथ : सिद्धेश्वर येथे सासरच्‍या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या; पतीसह तिघांवर गुन्हा दाखल

औंढा नागनाथ; पुढारी वृत्तसेवा : औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथील विवाहितेने सासरच्‍या छळाला कंटाळून आत्महत्या केली आहे. गंगासागर गजानन पोले (रा. सिद्धेश्वर, ता. औंढा नागनाथ) असे त्‍यांचे नाव आहे.  याप्रकरणी पतीसह सासू-सासर्‍यांवर गुन्‍हा दाखल करण्‍यात आला आहे.

माहेरहून दोन लाख रुपये घेऊन येण्यासाठी पती गजानन मारोतराव पोले , सासू रत्‍नाबाई मारोतराव पोले,  सासरा मारोतराव भगवानराव पोले यांनी गंगासागर हिच्‍या मागे तगादा लावला हाेता, अशी फिर्याद देवराव हाके (रा, पांगरा ) यांच्‍या फिर्यादीवरून औंढा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद झाला. आत्‍महत्‍या प्रकरणी गंगासागर पाेले यांच्‍या पतीसह सासू-सासर्‍याला अटक करण्‍यात आली आहे. तपास औंढा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ झुंजारे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय लांडगे व  वाळके करीतआहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button