देवेंद्र फडणवीस हे हिमालयाच्या उंचीचे नेते : आ. रमेशअप्पा कराड | पुढारी

देवेंद्र फडणवीस हे हिमालयाच्या उंचीचे नेते : आ. रमेशअप्पा कराड

लातूर, पुढारी वृतसेवा : भाजपाकडे संख्याबळ अधिक असतानाही एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी घोषित करून भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदासाठी आपण महत्त्वाकांक्षी नाही व सामान्यांच्या हितापुढे मुख्यमंत्री पदाची खुर्ची महत्त्वाची नाही, हे उभ्या महाराष्ट्राला दाखवून दिले आहे. खरोखरच देवेंद्र फडणवीस हे हिमालयाच्या उंचीचे नेते आहेत, अशी प्रतिक्रिया लातूर जिल्हा भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आ. रमेशआप्पा कराड यांनी दिली आहे.

राज्यात सत्ता बदल होत असताना मुख्यमंत्रिपदापेक्षा महाराष्ट्रातील जनतेचे हित महत्वाचे असल्याने फडणवीस यांनी भाजपच्या पाठिंब्यावर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करुन हिंदू हृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार केले आहे.

भाजपा पक्षश्रेष्ठी आणि देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा राज्यातील राजकारणाला दिशा देणारा असा विश्वास व्यक्त करीत फडणवीस यांचे अभिनंदन करून नूतन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचलंत का? 

Back to top button