लातूर : तीन दुचाकी चोरांना अटक; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त | पुढारी

लातूर : तीन दुचाकी चोरांना अटक; सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त

लातूर, पुढारी वृत्तसेवा : मोटारसायकलीची चोरी करून त्याची विक्री करणार्‍या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 1 लाख 17 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. चोरी प्रकरणी उदगीरसह लातूरात एकूण चार गुन्हे दाखल आहेत. करण तुकाराम सूर्यवंशी, किशोर सखाराम कांबळे व सुनील अशोक बुक्का अशी आरोपींची नावे असून ते उदगीरचे रहिवाशी आहेत.

पोलिस अधीक्षक डॉ. निखिल पिंगळे, अप्पर पोलिस अधीक्षक अनुराग जैन यांच्या निर्देशानुसार मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता विशेष पथके स्थापन करून स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलंवडे याच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा उघड करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्या पार्श्वभूमीवर पथके माहितीचे संकलन करीत होती. दरम्यान त्यांना गरुड चौक नांदेड रोड परिसरात चोरीच्या मोटारसायकली खरेदी व विक्रीचा व्यवहार होणार असल्याची माहिती मिळाली व पथकाने तेथे सापळा लावला व चोरीच्या मोटारसायकल खरेदी-विक्रीचा व्यवहार करणार्‍या उपरोक्त तिघांना ताब्यात घेण्यात आले.

त्यांना विश्वासात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी त्यांच्याकडील मोटारसायकली लातूर शहरातील विविध ठिकाणांहून चोरलेल्या असल्याचे सांगितले. दरची कामगिरी वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांच्या मार्गदर्शनात अमलदार अंगद कोतवाड, माधव बिल्लापट्टे, राजू मस्के, राजेश कंचे, जमीर शेख, नितीन कठारे, नकुल पाटील यांनी पार पाडली.

हेही वाचलंत का? 

Back to top button