नगर : पैशासाठी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी | पुढारी

नगर : पैशासाठी विवाहितेला जीवे मारण्याची धमकी

उंबरे : पुढारी वृत्तसेवा : माहेरहून तीन लाख रुपये आणले नाही, तर तुला जिवंत मारून टाकू, अशी धमकी देत विवाहित तरुणीला घरातून बाहेर हाकलून दिल्याची घटना राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथे घडली.

एकनाथ शिंदेंना मोठा दिलासा! शिवसेनेच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

सोनाली महेंद्र संसारे (वय 25, रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी. ह. मु. नांदगाव, ता. नगर) या विवाहित तरुणीने पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, सोनाली या नांदगाव येथील तरुणीचा विवाह दोन वर्षांपूर्वी राहुरी तालुक्यातील कुक्कडवेढे येथील महेंद्र संसारे या तरुणाबरोबर झाला होता. लग्न झाल्याच्या दोन महिन्यां नंतर आरोपी सोनाली हिला नेहमी म्हणायचे की, तुझ्या आई, वडिलांनी लग्नात आमचा व्यवस्थित मानपान केला नाही, तसेच हुंडा देखील दिला नाही. आपल्याला घराचे काम करण्यासाठी तू तूझ्या माहेरहून तीन लाख रुपये घेऊन ये. या कारणावरून सोनाली संसारे हिला वेळोवेळी शिवीगाळ करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली, तसेच तिला उपाशी पोटी ठेवून तिचा मानसिक छळ केला.

नुपूर शर्मानं टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी, वादग्रस्त वक्‍तव्यप्रकरणी सुप्रीम कोर्टानं फटकारलं

‘तू माहेरहून पैसे आणले नाही, तर तूला आम्ही जिवंत मारून टाकू, अशी धमकी देऊन, तू या घरात रहायचे नाही’ असे म्हणून तिला घरातून बाहेर हाकलून दिले. या महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी पती-महेंद्र मधुकर संसारे, सासरा-मधुकर कोंडिराम संसारे, सासू-प्रभावती मधुकर संसारे (सर्व रा. कुक्कडवेढे, ता. राहुरी) या तिघांवर गुन्हा दाखल केलेला आहे. पुढील तपास सुरू आहे.

 मी पळपुटा नाही म्हणत संजय राऊत ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर 

Back to top button