पुर्णा; पुढारी वृत्तसेवा : पुर्णा येथील रहिवासी तथा केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान दिलीप तुकाराम आडेकर यांचे आसाम राज्यातील गुवाहाटी येथे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले आहे. त्याचे पार्थिव शुक्रवार (दि.१जुलै ) रोजी पुर्णा येथे आणण्यात येणार असून तेथेच त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
जवान दिलीप तुकाराम आडेकर याच्या पश्चात पत्नी, दोन मुली, आई, वडील भाऊ असा परिवार आहे. पुर्णा येथील लोकजनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्रीधर आडेकर यांचे धाकटे बंधु होते.
हेही वाचलंत का?