राज्यात जे काही चालू आहे ते एकदा संपवा : छत्रपती संभाजीराजे | पुढारी

राज्यात जे काही चालू आहे ते एकदा संपवा : छत्रपती संभाजीराजे

वडीगोद्री, पुढारी वृत्तसेवा: महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहिली असता तर कोणालाही काही देणं घेणं नाही. राजकीय घडामोडीत जे काही चालू आहे, ते एकदाच संपवून टाका. जेणेकरून सामान्य माणसाचे मुलभूत प्रश्न मार्गी लागतील, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांना केले. ते औरंगाबाद दौऱ्यावर आहेत.

वडीगोद्री (ता.अंबड) येथे आज सह्याद्री इलेक्ट्रिकलचे संचालक अजयसिंह काळे, दीपक खोमणे, नितीन खोमणे, शुभम शिंगाडे यांनी संभाजीराजे यांचा सत्कार केला. यावेळी संभाजीराजे म्हणाले की, बहुजन समाज एकत्र करण्यासाठी आपलं काम आहे. २००७ पासून महाराष्ट्र पिंजून काढत आहे. शेतकरी केंद्रबिंदू मानून आपण महाराष्ट्रात काम करत आहोत. पाऊस अजून पडलेला नाही पेरण्या झालेल्या नाहीत. असे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात ज्या राजकीय घडामोडी चालू आहेत. त्या एकदाच संपवा जेणे करून राज्यातील सामान्य माणसाचे व शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न मार्गी लागतील. राज्यात अनेक प्रश्न आहे ते सोडवण्याची गरज आहे.

हेही वाचलंत का ? 

Back to top button