Aurangabad : ३५ टक्के गुणांनी काठावर पास झालेली चापानेरची अश्विनी म्हणते सैन्यातच जाणार | पुढारी

Aurangabad : ३५ टक्के गुणांनी काठावर पास झालेली चापानेरची अश्विनी म्हणते सैन्यातच जाणार

चापानेर; पुढारी वृत्तसेवा : चापानेरच्या विद्यार्थिनीने दहावी परीक्षेत सर्व विषयांत 35 गुण मिळवून 35 टक्के गुण प्राप्त करीत आगळावेगळा रेकॉर्ड केला आहे. चंपावती कन्या विद्यालयातील अश्विनी आप्पासाहेब शेलार असे या विद्यार्थिनीचे नाव आहे. या यशामुळे तिचे सर्वच कौतुक होत आहे.(Aurangabad)

कन्नड तालुक्यातील चापानेर येथील चंपावती कन्या विद्यालयाचा निकाल 93.82 टक्के लागला आहे. विद्यालयातील एकूण 81 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती. त्यापैकी 76 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. विद्यालयातील अश्विनी आप्पासाहेब शेलार हिने सर्वच विषयात 35 गुण मिळवले आहे. एकूण 500 पैकी तिने 176 गुण मिळवले. अश्विनीने मराठी, इंग्रजी, हिंदी, गणित, सामान्य विज्ञान व सामाजिक विज्ञान या सर्वच विषयांत समान गुण मिळवून सर्वांचे लक्ष वेधले आहे. (Aurangabad)

सैन्यात भरती होण्याचं अश्विनीचं स्वप्न

तिचे वडील आपासाहेब शेलार हे आचारी म्हणून परिचीत आहेत. अश्विनीचा मोठा भाऊ सैनिक भरतीसाठी अथक परिश्रम घेत होता. परंतु नियतीने त्याच्यावर घाला घातला. दीड वर्षापूर्वी चापानेर येथील धरणात बुडून त्याचा मृत्यू झाल्याने त्याचे देशभक्तीचे स्वप्न अपूर्ण राहिले. अश्विनीने सैन्यात भरती होऊन आपल्या भावाचे स्वप्न पूर्ण करण्याचा निर्धार केला आहे. मी आज दहावीच्या परीक्षेत सीमेवर उत्तीर्ण झाले तरी देशाच्या सीमेवर जाऊन भावाचे स्वप्न पूर्ण करणार असल्याचे तिने सांगितले.

हेही वाचा

Back to top button