हिंगोली: शिरड शहापूर येथे वॉर्डनिहाय ग्राम पंचायतचे आरक्षण | पुढारी

हिंगोली: शिरड शहापूर येथे वॉर्डनिहाय ग्राम पंचायतचे आरक्षण

शिरडशहापूर; पुढारी वृत्तसेवा: औंढा नागनाथ तालुक्यातील शिरड शहापूर येथे आज सोमवारी (दि. ६) रोजी ग्रामपंचायतीचे वॉर्डनिहाय आरक्षण काढण्यात आले आहे.

शिरडशहापूर येथे पाच प्रभाग असून त्यामध्ये ग्रामपंचायत सदस्यांसाठी वॉर्डनिहाय आरक्षण काढण्यात आले आहे. त्यात प्रभाग क्रमांक एकमध्ये सर्वसाधारण एक जागा एसटी महिला, एक जागा सर्वसाधारण महिलासाठी आहे. प्रभाग क्रमांक दोनमध्ये सर्वसाधारण एक जागा एससी महिला आणि एक जागा सर्वसाधारण महिलासाठी आहे.

प्रभाग क्रमांक तीनमध्ये एससी एक जागा, सर्वसाधारण एक जागा, सर्वसाधारण महिला एक जागा तर प्रभाग क्रमांक चारमध्ये सर्वसाधारण दोन जागा, सर्वसाधारण महिला एक जागा आहेत. तर प्रभाग क्रमांक पाचमध्ये सर्वसाधारण एक जागा, सर्वसाधारण महिला दोन जागा अशा प्रकारचे आरक्षण काढण्यात आले आहे.

हे आरक्षण काढण्यासाठी प्राधिकृत अधिकारी म्हणून पंचायत समितीचे विस्तार अधिकारी ए .सी. पुरी, तलाठी गोपाल मुकीर, ग्रामसेवक के. व्ही. देशमुख यांनी काम पाहिले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button