

संगमनेर विशेष :
संगमनेर तालुक्यातील रहिमपूर येथे लोणीच्या कृषी महाविद्यालयातील कृषिदूत शेतकर्यांना शेतीसंबंधीचे मार्गदर्शन करणार आहेत. पंचक्रोशीतील शेतकर्यांनी या कृषिदूतांचे उत्साहात स्वागत केले. लोकनेते पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पा. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्था व म. फुले कृषी विद्यापीठ संलग्नित लोणीच्या कृषी महाविद्यालयात राज्यभरातील विद्यार्थी शिक्षण घेतात.
प्राचार्या डॉ. शुभांगी सालोखे, प्रा. रमेश जाधव, प्रा. रवींद्र दसपुते, डॉ. दीपाली तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली कृषिदूत विशाल हगारे, कुणाल चाटे, शिवम कानवडे, प्रतीक बुर्हाडे, संदेश यादव, रोहित गुळवे शेतकर्यांचे अनुभव जाणून घेवून दोन-अडीच महिने शेतीसंबंधी मार्गदर्शन करणार आहेत. सरपंच बाजीराव शिंदे, चेअरमन बाजीराव वाळुंज, दिनकर शिंदे, आकाश वाळुंज व शेतकरी बांधवांनी कृषिदुतांचे स्वागत केले.