हिंगोली : नागेशवाडी शिवारात गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल | पुढारी

हिंगोली : नागेशवाडी शिवारात गुटखा जप्त; तिघांविरोधात गुन्हा दाखल

हिंगोली: पुढारी वृत्तसेवा: हिंगोली येथील औंढा नागनाथ ते शिरडशहापूर मार्गावर नागेशवाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारसह साडेसहा लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी तिघांवर हट्टा पोलिस ठाण्यात सोमवारी (दि.६) रोजी गुन्हा दाखल झाला आहे. नांदेड येथून गुटखा हिंगोलीत आणला जात होता.

गुटख्याच्या

याबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड येथून एका कारमधून रात्री गुटख्याची पोती हिंगोली येथे आणली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरुन पोलिस अधीक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधीक्षक यतीश देशमुख, गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेश मलपिल्लू, जमादार सुमीत टाले, शेख जावेद यांच्या पथकाने औंढा ते शिरडशहापूर मार्गावर वाहनांची तपासणी सुरू केली होती.

यादरम्यान, रात्रीच्या सुमारास पोलिसांनी कार चालकास थांबविले. यावेळी पोलिसांनी कार चालक सय्यद अन्वर हुसेन याच्याकडे कारमधील पोत्याबाबत विचारणा केली असता त्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. पोलिसांना त्यास ताब्यात घेऊन कारमधील पोत्यांची तपासणी केली. यात विमल, राजनिवास, गोवा गुटखा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी कार व त्यातील गुटख्याची पोती असा ६.५७ लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.

सहाय्यक पोलिस निरीक्षक मलपिल्लु यांनी कार चालकाची चौकशी केली असता त्याने सदर गुटखा नांदेड येथील देगलूरनाका भागातील गोल्डन जर्दा स्टोअर्स या दुकानातून आणल्याचे सांगितले. त्यावरून पोलिस निरीक्षकाच्या तक्रारीवरून हट्टा पोलिस ठाण्यात कारचालक सय्यद अन्वर हुसेन (रा. हिंगोली), तसेच नांदेड येथील शेख फहीम व शेख अकबर यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button