

चारठाणा, परभणी; पुढारी वृत्तसेवा : चारठाणा गावात सर्व धर्म व जातीचे ग्रामस्थ एकोप्याने राहत आहेत. पण गावातील काही तरूण व्हॉटसअॅप स्टेटसच्या माध्यमातून समाजात अराजकता माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजात कोणी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी गायकवाड यांनी दिला.
मंगळवारी (24 मे) पोलीस ठाण्यात बोलावण्यात आलेल्या शांतता कमिटीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, माझा धर्म माझी जात असे स्टेटस ठेवून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न तरूण पिढी करत आहे. माणुसकी जपा असेच प्रत्येक धर्म सांगतो. आपल्या धर्माचे आचारण करताना दुसऱ्याला त्रास देऊ नये याची सर्वांनी काळजी घ्यावी. कोणी समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये असे त्यांनी सांगितले.
या बैठकीला ओबीसी नेते व काँग्रेसचे कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, पोलीस उपनिरीक्षक विनोद साने, सरपंच अनिरुद्ध चव्हाण, उपसरपंच वाजेद कुरेशी, माजी उपसरपंच जलील इनामदार, उमर हाफिज, मौलाना गफार मुल्ला आदी उपस्थित होते.
हेही वाचलंत का ?