बीड : केज-कळंब रोडवर एसटी आणि मोटार सायकलचा अपघात

बीड : केज-कळंब रोडवर एसटी आणि मोटार सायकलचा अपघात
Published on
Updated on

केज(बीड), पुढारी वृत्‍तसेवा : केज-कळंब रोडवर सुर्डी फाट्याजवळ मोटार सायकल आणि एसटी बसचा अपघात झाला. या अपघतात मोटर सायकलस्वाराचा मृत्‍यु झाला.

या बाबतची माहिती अशी की, सोमवारी बिभीषण माणिक बचुटे (वय ३५ रा. गोटेगाव ता. केज (बीड)) हे दुचाकी क्र.(एम एच-१६/जी-१४६४) कळंब येथून गावाकडे येत असताना सायंकाळी ७:४५ च्या दरम्यान केज-कळंब रोडवरील सुर्डी फाट्याजवळ कळंबकडे भरधाव वेगाने येत असलेल्या कळंब आगराच्या बसने (क्र. एम एच-२०/बी एल-०१४८) समोरून जोराची धडक दिली. या अपघातात मोटार सायकलस्‍वाराच्या डोक्याला गंभीर मार लागला.

जखमी अवस्थेतील बिभीषण बचुटे याला चालक मकरंद घुले यांच्या सहाय्याने उपजिल्हा रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तिर्थ ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान मोटार सायकलस्‍वाराचा मृत्यू झाला. बिभीषण बचुटे यांच्या अपघाती मृत्यूमुळे त्यांचे कुटुंब उघड्यावर पडले असून हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचा  

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news