वाशिम : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार ; आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा | पुढारी

वाशिम : अल्पवयीन मुलीवरील बलात्कार ; आरोपीस १० वर्ष कारावासाची शिक्षा

वाशिम ; पुढारी वृत्तसेवा : पोलीस स्टेशन मंगरूळपीर येथे २०१७ रोजी फिर्याद दाखल केलेल्या बलात्कार गुन्हयातील आरोपीस १० वर्ष कारावसाची शिक्षा व ५००० रु. दंड, आणि दंड न भरल्यास ६ महीने कारावास अशी शिक्षा सुनावलेली आहे. प्रकाश लालसिंग चव्हाण (रा. गोलवाडी, ता. मंगरूळपीर) असे आरोपीचे नाव आहे.

आरोपीने पिडीत मुलीस पकडून शेताजवळील नाल्यात नेऊन तिच्या सोबत जबरदस्ती करुन तिच्यावर बलात्कार केला. सदर प्रकार आरोपीने ३ वेळा केल्याने पिडीत मुलीस गर्भधारणा झाली. तसेच कोणाला काही सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी त्याने दिली होती. अशा फिर्यादीच्या रिपोर्टवरुन त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात होता.

सदर गुन्हयाचे तत्कालीन तपास अधिकारी पो.उप.नि. असद खाँ पठाण व त्यांचे लेखनिक पो.कॉ. विनोद चित्तकवार ब.नं ७९३ व पो.कॉ. सुनिल गंडाईत ब. नं. २८३ यांनी केले आहे. गुन्हयाच्या साक्षी पुराव्यासह तपास करुन गुन्हयाचे दोषारोपपत्र सत्र न्यायालय वाशिम येथे दाखल केले .

सदर गुन्हयाचा खटला जिल्हा व सत्र न्यायालय मंगरुळपीर येथे मा. न्यायाधिश रचना आर. तेहरा मॅडम यांच्या समक्ष चालवला गेला. मा. न्यायाधिश तेहरा मॅडम यांनी दोन्ही पक्षाची बाजू ऐकून घेवून आरोपी प्रकाश लालसिंग चव्हाण (रा. गोलवाडी ता. मंगरुळपीर) यास १० वर्ष शिक्षा व ५००० रु. दंड आणि दंड न भरल्यास ६ महीने कारावास अशा प्रकारे शिक्षा सुनावली आहे.

सदर गुन्हयाचा तपास पो.उप.नि. असद खाँ पठाण व त्यांचे लेखनिक यांनी योग्यरित्या करुन गुन्हयातील फिर्यादीस न्याय मिळवून दिला. सदर प्रकरणी सरकारतर्फे सहायक सरकारी अभियोक्ता अँड श्री. पी. एस. ढोबळे यांनी काम पाहीले.

हेही वाचा

Back to top button