बीड : पारधी वस्तीवर दोन पोलिसांना जमावाकडून मारहाण | पुढारी

बीड : पारधी वस्तीवर दोन पोलिसांना जमावाकडून मारहाण

आष्टी ; पुढारी वृत्तसेवा : जबरी चोरी प्रकरणातील संशयित आरोपीच्या शोधात अंभोरा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक व पोलीस शिपाई पारोडी शिवार हद्दीतील पारधी वस्तीवर गेले होते. यावेळी तेथील जमावाने पोलिसांवर दगडफेक करून काठीच्या साह्याने मारहाण केली. ही घटना गुरुवारी (दि. १९) सकाळी ८ च्या सुमारास पारोडी हद्दीतील पारधी वस्तीवर घडली.

याबाबत अधिक माहिती अशी, अंभोरा पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक प्रल्हाद विष्णू देवडे व पोलीस शिवदास रमेश शिपाई हे दोघे गंभीर गुन्ह्यातील आरोपींच्या शोधासाठी गेले होते. त्यावेळी वस्तीवर पारधी समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू होता. देवडे आणि केदार यांनी त्यातील काही लोकांशी सदरील गुन्ह्यातील आरोपींबाबत विचारपूस केली. यानंतर अचानक कार्यक्रमामधील काही पारधी लोकांनी लाठी, काठी व दगडाने त्या दोघांना मारहाण केली. यामध्ये देवडे यांच्या हाताच्या बोटाला इजा झाली. तर केदार यांना मुका मार लागला आहे.

या प्रकरणातील ४ आरोपींना अटक करण्यात आली असून इतर पाच आरोपी फरार आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तसेच पुढील तपास आंभोरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित बेंबरे करीत आहेत.

हेही वाचलंत का ? 

Back to top button