बीड : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

बीड : सहा वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करणाऱ्या दोघांना अटक

गेवराई (बीड) ; पुढारी वृत्तसेवा: गेवराई तालुक्यातील रामपुरी याठिकाणी सहा वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केला असल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी तलवाडा पोलिसात बाललैंगिक अत्याचार तसेच अन्य कलमानुसार गून्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबतचे सविस्तर माहिती अशी की, सुंदर निवृत्ती तायड ( वय ३४ वर्ष ) व विनोद गणपत शरणांगत ( वय २२, दोघे राहणार रामपुरी तालुका गेवराई, जिल्हा बीड ) असे आरोपीचे नावे आहेत. दि. ५ मे रोजी घराच्या हाकेच्या अंतारावर असणार्‍या दोघांनी सहा वर्षाच्या चिमुकीला घेऊन जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याबाबतची माहिती पिडीतेच्या आईला लक्षात आल्यानंतर तिने तलवाडा पोलिसांत धाव घेवून याबाबत तक्रार दाखल केली होती.

या प्रकरणी पहिल्यांदा एक आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, पिडीतेला न्यायालयात हजर केल्यानंतर दोन व्यक्ती असल्याची बाब समोर आली. यानंतर पोलिसांनी दुसऱ्या व्यक्तीचा कसून तपास करण्यास सुरूवात केली. आरोपीकडे मोबाईल नसल्याने आरोपिना अटक करण्यास पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. यानंतर बुधवारी ( दि. ११) रोजी रात्री उशीराने मुख्य आरोपी व त्याच्या साथीदाराला पुण्यातील रामपुरी येथून अटक करण्यात आली. सदरची अटकेची कार्यवाई पिंक पथक प्रमुख तपास अधिकारी अर्चना भोसले, पो.हे. खाडे, पो.हे. जिक्रे, पो.हे. सोंळूखे यांनी केली आहे.

हेही वाचलंत का? 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news