बीड : बाजरीचे खळे चालू असताना मळणी यंत्रात तोल जावून पडल्‍याने महिला ठार | पुढारी

बीड : बाजरीचे खळे चालू असताना मळणी यंत्रात तोल जावून पडल्‍याने महिला ठार

गेवराई (बीड); पुढारी वृत्तसेवा: उन्हाळी बाजरीचे खळे चालू असताना मळणी यंत्रात महिलेचा तोल गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. मळणी यंत्रात पडल्याने महिलेचे शिर धडा वेगळे झाले आहे. ही घटना तालुक्यातील संगम जळगाव येथे गुरुवारी (दि.१२) रोजी सकाळी घडली.

याबाबतची अधिकची माहिती अशी की, तालुक्यातील कुंभे जळगाव येथे आज सकाळी आठ वाजता बाजरीचे खळे मळणी यंत्राव्दारे चालू होती. मळणी यंत्रात बाजरी टाकत असताना सुमित्रा सुदाम पांगरे (वय ३०) या महिलेचा तोल गेल्याने ती मळणी यंत्रात आतमध्ये ओढली गेली. यावेळी सुमित्रा पांगरे हिचा मृत्यू होवून शिर धडा वेगळे झाले. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button