इम्तियाज जलील : ‘राज सीएम उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने अभय दिले जात आहे का’? | पुढारी

इम्तियाज जलील : 'राज सीएम उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने अभय दिले जात आहे का'?

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : खासदार नवनीत राणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल होतो. परंतु, जाहीर सभेत सामाजिक भावना दुखावणाऱ्या व चिथावणीखोर वक्तव्य करणारे मनसेचे राज ठाकरे यांच्यावर साधे गुन्हे दाखल केले जातात. हा दुजाभाव का, केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाऊ असल्याने त्यांना अभय दिले जात आहे का ? असा सवाल उपस्थित करीत ठाकरे यांच्याविरोधातही देशद्रोहाचाच गुन्हा दाखल करा, अशी मागणी एमआयएमचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे.

शहरातील सांस्कृतिक मैदान येथील सभेत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुस्लिम समाजाच्या भावना दुखावेल, शहराची शांतता भंग होईल, समाजासमाज तेड निर्माण होईल, अशा पद्धतीने त्यांच्या तोंडात बोळा कोंबा, आवाज बंद करा, एकदाचे काय ते होऊन जाऊ द्या, असे वक्तव्य केले. त्याविरोधात पोलिसांना कारवाई करण्यासाठी तीन दिवस लागते. ठाकरे यांचे भाषण तपासले जाते. जाहीर सभेत सर्वांनी भाषण ऐकले. तरी देखील गुन्हा दाखल करण्यात उशीर केला जातो. तर दुसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानासमोर रस्त्यावर हनुमान चालीसा म्हणण्याचा प्रयत्न करणाऱ्या खा. राणा दाम्पत्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जातो. असे खा. जलील म्हणाले.

यावेळी जलील म्हणाले, मी राणा यांचे आपण समर्थन करणार नाही. परंतु, केवळ राज ठाकरे हे मुख्यमंत्री यांचे बंधू असल्यामुळे त्यांच्या विरोधात कारवाई करण्यास उशीर होतो. अन चिथावणीखोर भाषण करूनimtiaz jaleelही देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला जात नाही, हे अयोग्य असल्याचे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.

Back to top button