बीड : दहावीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या | पुढारी

बीड : दहावीत शिकणाऱ्या मुलीची गळफास घेऊन आत्महत्या

केज : पुढारी वृत्तसेवा : केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे एका १६ वर्षाच्या मुलीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना आज (दि.३) घडली आहे.

याबाबतची अधिक माहिती अशी की, केज तालुक्यातील जिवाचीवाडी येथे आज दुपारी १ वाजण्याच्या सुमारास प्रणिता निळकंठ चौरे (वय १६) या मुलीने राहत्या घरातील स्लॅबच्या लोखंडी हुकाला दोरीने गळफास घेवून आत्महत्या केली. प्रणिता इयत्ता दहावीच्या वर्गात शिकत होती. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. याबाबत माहिती मिळताच केज पोलीस ठाण्यातील पोलीस नाईक उमेश आघाव आणि बाळराजे सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पुढील कार्यवाही केली.

हेही वाचलंत का ? 

Back to top button