परभणी : टाटा सुमो-एसटीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू | पुढारी

परभणी : टाटा सुमो-एसटीची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू

जिंतुर; पुढारी वृत्तसेवा : परभणीहून जिंतुरकडे निघालेल्या टाटा सुमो आणि जिंतुरहून परभणीकडे येणाऱ्या एसटी बसची समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात सूमो चालक सुनील दत्तराव अभुरे (वय २८) याचा जागीच मृत्यू झाला.

याविषयी सविस्तर माहिती अशी की, गुरूवारी (दि. २१ ) रोजी रात्री १० वाजण्याच्या सुमारास परभणीहून जिंतुरकडे निघालेल्या टाटा सुमो (क्र. एम एच २८ डी ५७७७ ) आणि जिंतुरहून परभणीकडे येणाऱ्या एसटी बस (क्र. एमएच २० बीएल १७७७) यांच्यात समोरासमोर जोरदार धडक दिली.

जिंतुर-परभणी मार्गावरील शहरापासून ६ किमी अंतरावरील पांगरी पाटीजवळ हा अपघात झाला. यात कडसावंगी येथील रहिवाशी सुनील दत्तराव अभुरे याचा जागीच मृत्यू झाला. समोरासमोर झालेल्या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.

एक तासांच्या अथक प्रयत्न

हा अपघात एवढा भीषण होता की, सूमो चालक सुनील अभुरे याचा मृत्यदेह स्टेरिंगमध्ये अडकला होता. पोलिस व सामाजिक कार्यक्रर्ते नागेश आकात व रुग्णवाहिका चालक विजय राठोड यानी एक तासांच्या अथक प्रयत्नानंतर स्टेरिंगमधून त्याला बाहेर काढण्यात यश आले. यानंतर जिंतुरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता रुग्णालयातील डॉ. हनीफ खान, परिचारिका गावित यांनी मृत घोषित केले.

हेही वाचलंत का? 

Back to top button