Onion prices : दर घसरल्याने कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी

Onion prices : दर घसरल्याने कांद्याने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी
Published on
Updated on

नेकनूर, पुढारी वृत्तसेवा : गत महिन्यात कांद्याला २० ते ३० रुपये किलोचा  (Onion prices) भाव होता. तो आता ३ ते १० रुपयांपर्यंत घसरल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आले आहे. अनेक शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत कांद्याची वाहतूक पदरमोड करून करावी लागत आहे. यामुळे नेकनूर परिसरातील अनेक गावातील शेतकरी अडचणीत आले आहेत. सद्या मिळत असलेल्या दरात उत्पादन खर्चही निघत नाही.

(Onion prices ) कांदा हे नगदी आणि कमी वेळात चांगले उत्पादन देणारे पीक आहे. नेकनूरसह परिसरातील बंदेवाडी, चाकरवाडी, बाळापूर, बाभळगाव, सावंतवाडी ही गावे कांदा उत्पादक म्हणून ओळखली जातात. वर्षभरात लागोपाठ हेच पीक घेणारे काही शेतकरी परिसरात आहेत. अलीकडे वातावरण बदलल्याने खर्च ही वाढला आहे. रोपे, लागवड, फवारणी, काढणी, बारदाना ते बाजारपेठ वाहतूक यामुळे कांदा १५ ते २० रुपये दराने विकला, तरच शेतकऱ्यांना फायदा होतो. मात्र, तो १० रुपयांच्या आतमध्ये आला, तर उत्पादन खर्च निघणे अवघड बनते.

महिनाभरापूर्वी भाव ३० रुपयांपर्यंत होते. एकदम ते पडल्याने सोलापूर, बार्शी या मार्केटमध्ये कांदा घेवून गेलेल्या शेतकऱ्यांना हातात खर्च जाता काहीच उरले नसल्याने डोळ्यात पाणी आले . हे पीक सांभाळता येणारे नसल्याने त्याला जास्त काळ साठवून ठेवता येत नाही. याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

नेकनूर परिसरातील हजारो हेक्टरमध्ये रब्बीचा कांदा हे पीक घेण्याकडे शेतकऱ्याचा मोठा कल आहे. मात्र, भावात मोठी घसरण झाल्याने पदरमोड करण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. लागवड ते काढणी याचे गणित लावले, तर सध्या प्रतिवारीनुसार ३ ते १० रुपयांपर्यंत किलोला मिळणारा दर न परवडणारा आहे. त्यामुळे फायदेशीर वाटणाऱ्या कांद्याने आता शेतकऱ्यांवर रडण्याची वेळ आणली आहे.

रब्बीमध्ये गहू, ज्वारी, हरभरा यापेक्षा कांद्यामधून भाव राहिला. तर चांगला फायदा होतो. मात्र, सद्या भाव कोसळले असल्याने नुकसान सोसावे लागत आहे. एकरसाठी जवळपास ६० हजारापर्यंत खर्च झाला. मात्र, आताचा भाव खर्च तरी भरून काढेल का हा प्रश्न आहे.
– रामभाऊ बोराडे, शेतकरी

हेही वाचलंत का ? 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news