बीड : शेपवाडीतील मंदिरात थांबलेल्या पुजाऱ्याचा खून | पुढारी

बीड : शेपवाडीतील मंदिरात थांबलेल्या पुजाऱ्याचा खून

अंबाजोगाई, पुढारी वृत्तसेवा : शहरालगत असलेल्या शेपवाडी येथे मंदिराचे पुजारी संतोष दासोपंत पाठक (वय ५०, रा. रविवार पेठ, अंबाजोगाई) यांचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना शनिवारी (दि.२) दुपारी  घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

संतोष पाठक यांच्याकडे शेपवाडी गावातील सर्व पूजाअर्चा असतात. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज गुढीपाडवा असल्याने ते सकाळपासून शेपवाडी गावातील हनुमान मंदिरात थांबले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास त्यांच्यावर एका माथेफिरूने चाकूने अनेक वार केले. ग्रामस्थांनी गंभीर जखमी झालेल्या पाठक यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. परंतु तिथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचलंत का ? 

 

Back to top button