बीड : ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर I miss you, Sorry स्टेट्स ठेऊन युवकाची आत्महत्या | पुढारी

बीड : ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर I miss you, Sorry स्टेट्स ठेऊन युवकाची आत्महत्या

गेवराई, पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील आगर नांदूर येथील एका युवकाने ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर स्टेट्स ठेऊन झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी घडली. आत्महत्येचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. नितीन चिमाजी निर्मळ (वय २३, रा. आंगरनांदुर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नांव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, शुक्रवारी धुलीवंदनाच्या दिवशी नितीन गावात होता. मात्र, त्याच्या काही मित्राने त्याचे ‘व्हॉटस् अ‍ॅप’वर स्टेट्स पाहिले असता त्याने आपल्या स्टेट्समध्ये I miss you, my love, miss you friend, bay, my jigri, Sorry, शेवट, अशा प्रकारचा मजकूर लिहिला होता.

त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा शोध घेतला असता गावाजवळील गायरानातील एका लिंबाच्या झाडाला त्याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. गावक-यांनी तत्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली. बीट अंमलदार अशोक हंबरडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. व मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. मात्र, त्याने आत्महत्या का केली ? याचा तपास चालू आहे. त्याच्या पश्चात आई वडील, एक भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे.

हेही वाचलंत का ? : 

पहा व्हिडिओ : दुष्काळ ते 300 एकर ऊस लागवड करण्याऱ्या हिंगणगावाची गोष्ट

Back to top button