गेवराई : तरुणावर सपासप वार करुन हल्लेखोर पसार
गेवराई, पुढारी वृत्तसेवा : किरकोळ वादातून एका ३४ वर्षीय तरुणावर अज्ञात तीन जणांनी प्राणघातक हल्ला केला. तीक्ष्ण हत्याराने सपासप वार करुन हल्लेखोर पसार झाले. ही घटना गेवराईजवळील जातेगाव रोडवरील सोनवडी फाटा येथे आज (बुधवार) ५ वाजण्याच्या सुमारास घडली. ज्ञानेश्वर संजय तेलुरे (वय ३४, रा. सिराळा, ता. गेवराई) असे हल्ला झालेल्या तरुणाचे नाव आहे. गंभीर जखमी झालेल्या तरुणाला औरंगाबाद येथे रूग्णालयात हलविण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, ज्ञानेश्वर तेलुरे हा तरुण गेवराईहून स्वतःच्या मोटारसायकलने आपल्या गावाकडे सिराळा येथे आज सायंकाळी ५ च्या सुमारास परत जात होता. त्यावेळी जातेगाव रोडवरील सोनवाडी फाट्यावर त्याला मद्यपान केलेल्या तीन अज्ञातांनी पाण्याची बाटली फेकून मारली. दरम्यान, ती बाटली का मारली, याचा जाब ज्ञानेश्वर याने विचारल्याने मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तीन तरूणांनी त्यांच्याकडे असलेल्या तीक्ष्ण हत्याराने त्याच्या अंगावर सपासप वार करून पसार झाले. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी मोठा जमाव जमा झाला होता. जखमी तरूणाला गेवराईच्या खासगी रूग्णालयात प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलवण्यात आले आहे.
हेही वाचलंत का ?
पहा व्हिडिओ : पहिली मालिका ते पहिला क्रश | Rapid Fire with aayush sanjeev

