जळगाव : दोन दिवसांत ३ लाख पळविणारे दोघे ताब्यात | पुढारी

जळगाव : दोन दिवसांत ३ लाख पळविणारे दोघे ताब्यात

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेड येथील घरातून ३ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून २ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

या घटनेत योगेश राजेंद्र कुमावत (वय २५), छायाबाई ऊर्फ वर्षा नारायण पाटील, (वय-३३, दोन्ही रा. मुंदखेडे, ता.चाळीसगाव) अशी अटक केलेल्याची नावे आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेड (ब्रु.) येथील रामदास धना पाटील (वय ८२) यांचे राहत्या घरातून अज्ञाताने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचे ऐवज चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी २०२२ रोजी मध्यरात्री घडली होती. याप्रकरणी रामदास धना पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होता. याचा तपास पो.उ.नि. लोकेश पवार हे करीत होते.

दरम्यान ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना याबाबतची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिस पथकाने सापळा रचून योगेश कुमावत, छायाबाई ऊर्फ वर्षा पाटील दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी दागिन्यासह १ लाख ४० हजार रूपये असे एकूण २ लाख २२ हजार २० रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, सफौ. राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ. नितीन सोनवणे, मपोना. मालती बच्छाव, पोना. शंकर जंजाळे, संदिप माने, मनोज पाटील, भूपेश वंजारी, गोवर्धन राजेंद्र बोरसे,  शांताराम सिताराम पवार, प्रेमसिंग राठोड या पथकाने केली आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button