हिंगोली : युक्रेनहून परतला आखाडा बाळापूरचा मोहम्मद शायन कुरेशी | पुढारी

हिंगोली : युक्रेनहून परतला आखाडा बाळापूरचा मोहम्मद शायन कुरेशी

आखाडा बाळापूर; पुढारी वृत्तसेवा : आखाडा बाळापूर येथील मोहम्मद शायन मोहम्मद जकी कुरेशी हा युवक युक्रेनची राजधानी कीव येथून हैदराबाद मार्गाने आखाडा बाळापूरला पोहोचला आहे.

युक्रेन येथून परतलेल्या आखाडा बाळापुरच्या मोहम्मद शायन कुरेशी याने ‘पुढारी’ शी बोलताना सांगितले की, रशिया व युक्रेन यांचे युद्ध होईल अशी कोणतीही माहिती मिळाली नव्हती. तर अमेरिकेचे युद्ध होईल अशी कोणीतीही माहिती विद्यार्थी अथवा नागरिकांमध्ये नव्हती. परंतु, भारतामध्ये युक्रेन व रशियाची युद्ध लवकरच सुरु होणार असल्याचे बातम्या नेहमी समोर येत होत्या. याच दरम्यान मला कुंटूबियाकडून सतत फोन येते होते. आणि लवकरात-लवकर घरी म्हणजे, भारतात परतण्याचे सांगितले जात होते.

दररोज घरच्यांकडून फोन येत असल्याने २३ तारखेला युक्रेनची राजधानी कीव येथून दिल्लीमार्गे हैदराबादला पोहोचलो. माझ्यासोबतचा योगेश रोडगे (मुखेड, जि. नांदेड) हा तरूण तिथेच अडकून पडला असल्याचे त्याने सांगितले.

मोहम्मद कुरेशी गेली तीन वर्षापासून एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीमध्ये तो तिसऱ्या वर्षात शिक्षत आहे. तर घरी पोहोचताच रशिया व युक्रेनचे युद्ध सुरू झाले. घरी परतल्याने माझ्या आई- वडीलसह कुटुंबियांचा जीव भांड्यात पडला असे देखील त्यांने सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button