बीड : घातपात की आत्महत्या; घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ | पुढारी

बीड : घातपात की आत्महत्या; घटनेने गेवराई तालुक्यात एकच खळबळ

गेवराई (जि.बीड), पुढारी वृत्तसेवा : गेवराई शहरापासून जवळ असलेल्या पालख्या डोंगरावर एक मानवी शरीराचा सांगाडा सापडला आहे. या सांगाडयाचे शीर झाडाला टांगले आहे तर धडाचा सापळा खाली पडलेला आहे. यामूळे गेवराई तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, गेवराई तालुक्यातील पालख्या डोंगरावर एक बेवारस दुचाकी पडलेली आहे, अशी माहिती 24 फेब्रुवारी रोजी रात्री पोलीसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी घटना स्थळावर जावून पाहणी केली.

दरम्‍यान, तेव्हा एका झाडाला मानवी सांगाडा लटकलेलेल्या आवस्थेत आढळला. यामधे त्याचे शीर झाडाला टांगलेले होते आणि शरीराचा उर्वरित भाग खाली पडलेला होता. पोलीसांनी पंचनामा करुन सांगाडा तपासणीसाठी आंबाजोगाई येथे पाठवला आहे. गेल्‍या दिड महिन्यापूर्वी या परिसरातील एक मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीसांना प्राप्त झाली होती. त्या अनषंगाने पोलीस तपास करित आहेत. हा घातपात आहे की आत्महत्या हे अद्यााप स्पष्ट झालेले नाही.

हे ही वाचा  

Back to top button