भारतातील सुरक्षित कारमध्ये तुमची कार आहे का? पहा कारची यादी | पुढारी

भारतातील सुरक्षित कारमध्ये तुमची कार आहे का? पहा कारची यादी

पुणे : पुढारी वृत्तसेवा

Safer Cars For India मोहिमेचा एक भाग म्हणून, “ग्लोबल एनसीएपी”ने स्वदेशी बनावटीच्या चार मेड इन इंडिया कारची क्रॅश चाचणी केली आहे. जीएनसीएपीमध्ये रेनॉल्ड कीगर, निसान मॅग्नाइट, होंडा जॅझ आणि चौथ्या पिढीच्या होंडा सिटी सेडानचा या कारचा समावेश होता. ग्लोबल एनसीएपीने अलीकडेच या क्रॅश चाचणीचे निकाल सार्वजनिक केले आहेत. त्यात समाविष्ट असलेल्या सर्व कारना सुरक्षितता रेटिंगमध्ये 4 स्टार मिळाले आहेत. जी खूप चांगली गोष्ट आहे. तुम्ही सध्या वापरत असलेली कार सुरक्षित आहे का? किंवा तुम्ही देखील कार घेण्याचा विचार करत असाल, तर तुम्हाला हे माहित असलेच पाहिजे की कोणती कार सर्वात सुरक्षित आहे.

देव तारी त्याला कोण मारी! बापाने घेतली मुलासह धावत्या रेल्वेसमोर उडी, मात्र मुलगा वाचला

होंडा जॅझ

होंडा जॅझला ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश रेटिंगमध्ये प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी 4 स्टार मिळाले आहेत. त्याचबरोबर या कारला चाइल्ड ऑक्युपंट सेफ्टीमध्ये (लहान मुलांसाठीच्या सुरक्षिततेसाठी) 3 स्टार मिळाले आहेत. कार अपघात चाचणीत, होंडा जॅझने प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये 17 पैकी 13.89 गुण मिळवले, तर बालकांच्या सुरक्षेमध्ये एकूण 49 गुणांपैकी 31.54 गुण मिळाले.

निस्सान मॅग्नाईट

निस्सान मॅग्नाइट एसयूव्हीने प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षिततेसाठी कार क्रॅशमध्ये 4 स्टार मिळवले आहेत. तसेच या कारला लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये 2 स्टार मिळाले आहेत. निस्सान मॅग्नाइटच्या कार क्रॅश रेटिंगच्या गुणांबद्दल सांगायचे झाल्यास, या कारला प्रौढांच्या सुरक्षेमध्ये 17 पैकी 11.85 पॉइंट्स आणि लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये 49 पैकी 24.88 पॉइंट मिळाले आहेत.

चंद्रपूर : महाऔष्णिक वीज केंद्रातून घरी येणाऱ्या कामगाराला वाघाने नेले फरफटत

रेनॉल्ट किगर

रेनॉल्टची सर्वात लोकप्रिय एसयूव्ही किगरने ग्लोबल एनसीएपी कार क्रॅश रेटिंगमध्ये प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षेमध्ये 4 स्टार मिळवले आहेत. तसेच या एसयूव्हीला लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये 2 स्टार मिळाले आहेत. या एसयूव्हीला प्रौढ व्यक्तींमध्ये 17 पैकी 12.34 गुण मिळाले आहेत. तर लहान मुलांच्या सुरक्षेमध्ये 49 पैकी 21.05 गुण मिळाले आहेत.

होंडा सिटी सेडान

होंडाच्या चौथ्या पिढीतील होंडा सिटी सेडान या कारला क्रॅश चाचणीमध्ये प्रौढ व्यक्तींमध्ये 4 स्टार आणि लहान मुलांमध्ये 4 स्टार मिळाले आहेत. पण या कारला क्रॅश रेटिंग स्कोअरमध्ये प्रौढ व्यक्तींच्या सुरक्षिततेमध्ये 17 पैकी 12.03 आणि लहान मुलांच्या सुरक्षिततेमध्ये 49 पैकी 38.27 मिळाले आहेत.

या कार भारतातील सुरक्षित कार आहेत. त्यामुळे जर तुम्ही कार घेण्याचा विचार करत असाल तर कारची सुरक्षा रेटींगस् तपासून मगच कार घ्यायला हवी.

हेही वाचा :

Ishant Sharma : इशांत शर्माने केलेल्या विधानावरून घेतला यू-टर्न!

RBI Assistant Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियामध्ये ९५० सहाय्यक पदांसाठी भरती

मुंबई ते बेलापूर प्रवास अवघ्‍या 30 मिनिटात ; वॉटर टॅक्सी सुरु

Back to top button