बीड : केज-अंबाजोगाई रोडवर गाडीने घेतला पेट | पुढारी

बीड : केज-अंबाजोगाई रोडवर गाडीने घेतला पेट

केज(जि.बीड):पुढारी वृत्तसेवा : केज-अंबाजोगाई रोडवर कुंबेफळजवळ धावत्‍या गाडीने पेट घेतला. सुदैवाने चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीत हानी टळली.

आज सकाळी ८:३० या दरम्‍यान लातूर कडून निघालेले (एमएच-४८/एस-२८५२) कार लातूरकडून औरंगाबाच्या दिशेने जात हाेती. कुंबेफळजवळ तिने अचानक पेट घेतला. हीबाब चालकाच्या लक्षात येताच त्याने कार थांबवली. गाडीमधील सर्वांना खाली उतरले. चालकाच्या प्रसंगावधानामुळे जिवीत हानी टळली, अशी माहिती केज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे आणि युसूफवडगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीप दहीफळे यांना दिली.

हेही वाचलं का?  

Back to top button