हिंगोली : कृषी बाजारात वॉचमनला रॉडचा धाक दाखवत चोरी | पुढारी

हिंगोली : कृषी बाजारात वॉचमनला रॉडचा धाक दाखवत चोरी

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा : हिंगोली ते कळमनुरी मार्गावर उमरा पाटीजवळ गजानन कृषी बाजार या ठिकाणी मंगळवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास आलेल्या सहा ते सात जणांनी वॉचमनला रॉडचा धाक दाखवत आणि जिवे मारण्याची धमकी देवून ४० हजार रुपये पळविल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसह स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या शोध घेण्यासाठी इतरत्र पथके रवाना झाली आहेत.

कळमनुरी मार्गावर उमरा पाटीजवळ हिंगोली येथे हेडा बंधूंचे गजानन कृषी बाजार आहे. याठिकाणी शेतीमालाची खरेदी- विक्री केली जाते. दररोज शेकडो क्विंटल धान्याची खरेदी याठिकाणी होते. या ठिकाणी शेतीमालाची विक्री केल्यानंतर लगेचच ग्राहकांना पैसे दिले जातात. या भागात सुरक्षेसाठी वॉचमन देखील ठेवण्यात आले आहेत.

दरम्यान, मंगळवारी (दि.८) रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास दोन वॉचमन ड्युटीवर होते. यावेळी तेथे सहा ते सात जणाच्या टोळक्याने लोखंडी रॉड घेऊन येथे आले. त्यापैकी दोघेजण दोन्ही वॉचमनला धमकावत आत शिरले. चोरट्यांनी वॉचमॅनला आरडा-ओरड केली तर जिवे मारण्याची धमकी देत केबिनमध्ये शिरले. त्या ठिकाणी तोडफोड करून सुमारे ४० हजार रुपये घेऊन चोरट्यांनी पळ काढला. मात्र, यावेळी चोरटे आणि वॉचमनसोबत झटापट झाली. यावेळी चोरट्यांनी एका वॉचमनचा मोबाईल चोरून नेला.

पैशासाठी चक्क आईनेच विकला पोटचा गोळा!; मुलगा हरवल्याचा केला बनाव

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर, पोलिस अधिक्षक राकेश कलासागर, सहाय्यक पोलिस अधिक्षक यतीश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, कळमनुरीचे निरीक्षक सुनील निकाळजे, गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक शिवसांब घेवारे यांच्यासह पोलिस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने पोलिसांची पथके रवाना केली आहेत. औढा नागनाथ तालुक्यातील दुर्गम भागात चोरट्यांचा शोध घेतला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

हेही वाचलंत का? 

Back to top button