

हिंगोली, पुढारी वृत्तसेवा
औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी आलेल्या गर्भवती महिलेचा विनयभंग करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यावर आज गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून गणेश राजय्या बंडेवार असे त्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, औंढा नागनाथ येथील 24 वर्षीय महिला चार महिन्यांची गर्भवती होती. मात्र शनिवारी त्यांना अचानक पोटदुखीचा त्रास होऊ लागला. त्यानंतर रविवारी सकाळी साडेअकरा वाजता सदर महिला एका नातेवाईकासोबत औंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयात तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी त्याचे कर्तव्य असलेल्या आधी परिचारिकेने सदर बाब वैद्यकीय अधिकारी गणेश राजय्या बंडेवार यांना सांगितली.
महिलेला तपासणीसाठी प्रसुतीगृहात नेण्यात आले. त्या ठिकाणी सदर महिलेची तपासणी करत असताना वैद्यकीय अधिकारी बंडेवार याने तिचा विनयभंग केला. महिलेने हा प्रकार त्यांच्या नातेवाईकांना सांगितल्यानंतर त्यांनी थेट पोलिस ठाणे गाठले. याप्रकरणी त्या महिलेने औंढा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी वैद्यकीय अधिकारी गणेश बंडेवाविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक वैजनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सिद्धिकी यांच्या पथकाने तपास करीत आहेत.
हेही वाचलं का?