अनैतिक संबंधात मुलगा ‘अडचण’ वाटू लागल्याने आईनेच प्रियकराच्या मदतीने संपवले

अनैतिक संबंधात मुलगा ‘अडचण’ वाटू लागल्याने आईनेच प्रियकराच्या मदतीने संपवले
Published on
Updated on

जळगाव ; पुढारी वृत्तसेवा : अनैतिक संबंधाच्या आड येणार्‍या मुलास गळफास देऊन ठार मारल्याची धक्कादायक घटना जळगावात घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी महिला आणि तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली असून दोघांना कोठडीत रवाना केले आहे. (Jalgaon Crime)

सावखेडा शिवारात असलेल्या जलाराम नगरात विलास नामदेव पाटील हे राहतात. विलास पाटील हे चालक असून पत्नी मंगला पाटील आणि प्रमोद शिंपी यांचे वर्षभरापासून सूत जमले होते. त्यांच्या अनैतिक संबंधांमध्ये मुलगा प्रशांत पाटील हा अडसर ठरत होता.

यामुळे आई मंगलाबाई आणि प्रमोद शिंपी यांनी मुलाला १६ जानेवारी रोजी रावेर येथून कबुतर ठेवण्याचा पिंजरा घेवून येवू असे आमीष दाखवत नेले. प्रशांत याला त्याची आई मंगलबाई आणि प्रमोद हे दोन्ही सोबत घेवून मध्यप्रदेशातील बर्‍हाणपुर गावानजीकच्या जंगलात घेऊन गेले.

त्यांनी प्रशांत पाटील याला गळफास देवून झाडाला लटकावून दिले. तेथून ही महिला पुन्हा जळगावात घरी आली. इकडे मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार प्रशांतचे वडील विलास पाटील यांनी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी हरविल्याची नोंद करण्यात आली.

पोलीसांनी मयत प्रशांतच्या मोबाईलचे कॉल डिटेल तपासले असता प्रमोद शिंपी यांच्या मोबाईलवर वारंवार कॉल केल्याचे दिसून आले. त्यानंतर पोलीसांनी तांत्रिक मदतीने प्रमोद शिंपी आणि मयत प्रशांत पाटीलचे लोकेशन एक असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी तपासाला सुरूवात केली.

jalgaon crime : पोलिसांकडून दोघांना अटक

पोलिसांनी २६ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता संशयित आरोपी प्रमोद जयदेवर शिंपी याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. यासाठी मयत प्रशांतची आई मंगलाबाई पाटील याचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना अटक केली. पोलीसांनी बर्‍हाणपुर येथील जंगलातील घटनास्थळी जावून मुलाच्या मृतदेहाचा पंचनामा केला.

दरम्यान, मुलाचा खून करणार्‍या दोन्ही संशयित आरोपींना गुरूवार २७ जानेवारी रोजी जिल्हा न्यायालयात हजर केले असता दोघांना न्यायालयोन १ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

या गुन्ह्याच्या तपासाकामी पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, उपनिरीक्षक नयन पाटील, सहाय्यक फौजदार वासुदेव मराठे, सतीश हाळणोर, भांडारकर यांच्यासह गुन्हेशोध पथकाने परिश्रम घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news