बीड : प्रजासत्ताक दिनी धारूर येथील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न | पुढारी

बीड : प्रजासत्ताक दिनी धारूर येथील युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

धारूर, पुढारी वृत्तसेवा : कोरोना काळात कोविड सेंटरला गादी व इतर साहित्य पुरविले. परंतु, याचे देयक तहसील कार्यालयाने दिले नाही. यामुळे धारूर येथील एका युवकाने अंगावर रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच रोखल्याने पुढील अनर्थ टळला. आत्मदहन करणाऱ्या युवकाचे पवन तट असे नाव आहे.

कोरोना काळात स्वतःच्या जीवाची पर्वा न करता कोरोना सेंटरला पवन तट यांनी गाद्या, बेडशीट व इतर साहित्य पुरविले होते. याचे देयक मिळावे यासाठी ते सतत प्रयत्न करत होते. तहसील कार्यालयात या बिलासाठी दीड वर्षापासून ते चकरा मारत होते. याच दरम्यान अनेक अर्ज आणि विनंत्या करूनही बिल निघत नसल्याने व्यवसायिक पवन तट यांनी प्रजासत्ताक दिनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी पोलिसांनी पवनला रोखल्याने अनर्थ टळला. दरम्यान या साऱ्या प्रकाराची आमदार प्रकाश सोळंके यांनी दखल घेतली असून ते धारूर तहसील प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे समजले आहे.

हेही वाचलंत का? 

Back to top button