फेक मेसेज करून केली हजाराेंची फसवणुक | पुढारी

फेक मेसेज करून केली हजाराेंची फसवणुक

गेवराई; पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील गाडेवाडी येथील एका तरूणाला मोबाईवर मेसेज करून तुम्हाला नवीन आयफोन मिळणार असल्याची बतावणी करून तब्बल ८४ हजाराला गंडा घातला असल्याची फिर्याद चकलांबा पोलिसांत दाखल करण्यात आली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, गाडेवाडी येथील एका महिलेच्या मोबाईल एक अननोन मेसेज आला. हा मेसेज या महिलेच्या मुलाने वाचला आणि यात आपल्याला कमी पैश्यात आयफोन मिळेल आणि आपले पैसे परत खात्यावर मिळतील. असा तोतिया गिरी करणारा मेसेज तरूणाने वाचला. व त्यांनी संपर्क करून त्या खात्यावर ऑनलाईन पैसे टाकले. नंतर हा सगळा प्रकार कुटूंबियातील लोकांना समजल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

या प्रकरणी माहिती व तत्रंज्ञान कायद्यासह अन्य कलामान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास चकलांबा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नवले करत आहेत.

हेही वाचलत का?

Back to top button